Pune : वीजबिल भरणा केंद्र 31 मार्चला सुरु राहणार

एमपीसी न्यूज – थकबाकी व चालू वीजबिलांचा वीजग्राहकांना भरणा करता यावा म्हणून पुणे परिमंडलातील महावितरणचे सर्व वीजबिल भरणा केंद्र रविवारी, दि. 31 मार्चला सुटीच्या दिवशी सुरु राहणार आहेत.
पुणे परिमंडलातील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वीजग्राहकांना चालू व थकीत वीजबिलांच्या रकमेचा भरणा करणे सोयीचे व्हावे, यासाठी रविवारी (दि. 31) सार्वजनिक सुटी असली तरी पुणे व पिंपरी चिंचवड शहर तसेच मंचर, राजगुरुनगर व मुळशी विभागातील महावितरणचे सर्व अधिकृत वीजबील भरणा केंद्र कार्यालयीन वेळेत सुरु राहणार आहेत.
चालू व थकीत वीजबिलांचा भरणा करण्यासाठी अधिकृत वीजबील भरणा केंद्रांसह www.mahadiscom.in ही वेबसाईट तसेच महावितरण मोबाईल अ‍ॅपद्वारे ‘ऑनलाईन’ सोय उपलब्ध आहे. ग्राहकांनी संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी चालू देयकांचा मुदतीत व मागील महिन्यांतील थकबाकीचा त्वरित भरणा करावा असे आवाहन महावितरणने केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.