Pune : स्वच्छ सर्वेक्षणात कर्मचाऱ्यांचा मोलाचा वाटा -माधुरी मिसाळ

एमपीसी न्यूज – आम्ही उठण्याच्या अगोदर पुणे शहर स्वच्छ करण्याचे काम कर्मचारी करतात. त्यांचा स्वच्छ सर्वेक्षणामध्ये मोलाचा वाटा आहे, असे प्रतिपादन आमदार माधुरी मिसाळ यांनी केले. आज तुम्हाला इतकं सुंदर आरोग्य मंदिर बांधून देण्यात आले आहे. त्याची निगाही चांगली ठेवावी, इतकी सुंदर कोठी मी आजपर्यंत पाहिली नाही. त्यामुळे माझ्या कामगार बंधू-भगिनी चे चांगली सोय होणार असल्याचेही त्या म्हणाल्या.

प्रभाग क्र. 28 ड मध्ये महर्षीनगर येथील कला भूमी येथे नगरसेवक प्रवीण चोरबेले यांच्या प्रयत्नातून आरोग्य कोठी बांधण्यात आली. त्यांचे उदघाटन माधुरी मिसाळ यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी नगरसेविका राजश्री शिळिमकर, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अशोक हांडे, संत नारायण गुरु अभ्यासिकाचे प्रमुख वसंजी खरे, बिबवेवाडी प्रभागाचे उपायुक्त अविनाशजी सपकाळ, माजी नगरसेविका मनीषा चोरबेले अविनाश शिळिमकर उपस्थित होते. प्रस्ताविक प्रवीण चोरबेले यांनी केले.

सूत्रसंचालन राजेंद्र सरदेशपांडे यांनी, तर आभार हेमंत देशपांडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवा केंगारे, अनिल भन्साळी, राजाभाऊ मेघावत, महेश कांबळे, मयुर कोठारी, मंगेश शाहणे, जयेश कर्नावट, अमित माशाळे, गणेश शिंदे, सागर निंबाळकर, भरत मोरे, अधिकारीमध्ये विक्रम काथवटे, संतोष पितळे आदी उपस्थित होते.

HB_POST_END_FTR-A2
You might also like