Pune : जुनी पेन्शन योजनेसाठी कर्मचाऱ्यांचे पुण्यात ठिय्या आंदोलन

एमपीसी न्यूज : मागील चार दिवसांपासून राज्यातील शासकीय (Pune) सेवेतील कर्मचारी जुनी पेन्शन योजना लागु करण्यात यावी. या मागणीसाठी कर्मचारी बेमुदत संपावर आहेत. याच पार्श्वभूमीवर आज पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हजारोच्या संख्येने कर्मचारी ठिय्या आंदोलनास बसले असून जोवर राज्य सरकार जुन्या पेन्शनचा निर्णय घेत नाही. तोपर्यंत आम्ही आंदोलनाच्या ठिकाणीहून हटणार नाही असा पवित्रा सर्व आंदोलनकर्त्यांनी घेतला आहे.

राज्य सरकारने जुनी पेन्शन लागू करावी, या मागणीसाठी राज्यातील शासकीय कर्मचारी मागील चार दिवसांपासून बेमुदत संपावर गेले आहेत. त्यामुळे सर्व सामन्य नागरिक ते शेतकरी वर्गाची कामे खोळंबली आहेत.

तर यामध्ये जिल्हा रुग्णालयातील रुग्णांचे सर्वाधिक हाल होत आहेत. या सर्व प्रश्नावर मुंबईत सुरू असलेले शिंदे फडणवीस सरकारला विरोधकांनी कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.

मात्र त्यावर राज्य सरकार मार्फत कोणत्याही प्रकाराचा निर्णय घेतला जात नाही. त्यावर अखेर आज पुण्यातील कर्मचारी वर्गाने जिल्हा परिषद, विभागीय आयुक्त कार्यालय आणि पुणे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

Moshi News: मोशी-आदर्शनगरमध्ये वीजवाहिन्या होणार भूमिगत

तर या मोर्चामुळे पुणेकर नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे (Pune) लागत असून जोवर राज्य सरकार जुन्या पेन्शन योजनेचा निर्णय घेत नाही. तोपर्यंत आम्ही आंदोलनाच्या ठिकाणाहून हटणार नाही.अशी भूमिका घेतली नाही. त्यामुळे राज्यभरात कर्मचारी वर्गाच्या या आंदोलनाबाबत काय भूमिका घेते हे पाहणे जरुरीचे ठरणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.