Pune : ‘हिंदू एकता दिंडीची’ सांगता

एमपीसी न्यूज –  सनातन संस्थेचे संस्थापक आणि हिंदु जनजागृती समितीचे प्रेरणास्रोत (Pune) सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या 81 व्या जन्मोत्सवानिमित्त अखिल भारतात ‘हिंदु राष्ट्र-जागृती अभियान’ राबविण्यात आले. या अभियानांतर्गत रविवारी (दि.28) हिंदू एकता दिंडीचे आयोजन करण्यात आले.

यावेळी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांची प्रतिमा, महाराष्ट्राची कुलदैवत श्री भवानी माता आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा यांचे पूजन करून शनिपार चौक – लक्ष्मी रस्ता – अलका टॉकीज चौक मार्गे स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारका समोर विमलाबाई गरवारे शाळेच्या मैदानात दिंडीची सांगता झाली.

सनातन संस्थेचे साधक,हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते,समविचारी संघटनांचे कार्यकर्ते,भोर मधील फार्मसी कॉलेजचे विद्यार्थी, गायत्री परिवार, वारकरी संप्रदायातील विठ्ठलभक्त तसेच भोर, शिरवळ, जुन्नर, तळेगाव, लोणावळा येथील अनेक संघटना आणि हिंदुत्वनिष्ठ असे एकूण 12 हजार नागरिक यावेळी सहभागी झाले होते.

Mahavitaran : रूफटॉप सोलरमुळे गृहनिर्माण संस्थांच्या वीजबिलात मोठी कपात – महावितरण

नऊवारी साडी नेसलेल्या सुवासिनी, रणरागिणी, हिंदू संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या पारंपरिक वेशातील साधक, कार्यकर्ते, तुळशी घेतलेल्या महिला अशी विविध प्रकारची पथके, छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशातील बालवीर, मावळे, बाजी प्रभू देशपांडे, झाशीच्या राणी लक्ष्मीबाईंच्या वेशातील रणरागिणी तसेच स्वसंरक्षणाची प्रात्यक्षिके हे दिंडीचे मुख्य आकर्षण होते .

हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या जयघोषात, राम नाम संकीर्तन तसेच भक्तीमय वातावरणात दिंडी विमलाबाई गरवारे शाळेच्या मैदानात पोहचली. या वेळी ह.भ.प.दत्तात्रय चोरघे महाराज, काश्मिरी हिंदू सभा पुणेचे सरचिटणीस रोहित भट, तसेच सनातन संस्थेचे चैतन्य तागडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. रणरागिणी शाखेच्या क्रांती पेटकर यांनी सहभागी झालेल्या धर्मवीरांचे आभार मानून हिंदू एकता दिंडीची सांगता (Pune) झाली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.