Pune : हेल्मेट बाबत प्रबोधन करा, पण सक्ती नको : योगेश गोगावले

एमपीसी न्यूज – पुणे शहरात वाहतूक पोलिसांकडून जे दुचाकी चालक हेल्मेट घालत नाही. अशावर दंडात्मक कारवाई करीत आहे. ही चुकीच्या पद्धतीने कारवाई करण्यात येत असून हेल्मेट विषयी नागरिकांमध्ये प्रबोधन करावे.
मात्र हेल्मेट सक्ती करता कामा नये. अशी भूमिका भाजप शहर अध्यक्ष योगेश गोगावले यांनी मांडली. तर  हेल्मेट सक्तीचा निर्णय 15 जानेवारी पर्यन्त मागे न घेतल्यास भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता शहरातील चौकामध्ये प्रबोधन करण्याचे काम करेल. या कारवाई च्या पार्श्वभूमीवर लवकरच पोलीस आयुक्तांना भेटून चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

तर पुणे शहरात हेल्मेट सक्तीच्या विरोधात आठवडाभरापासून शहरातील विविध भागात राजकीय पक्षाकडून आंदोलन करण्यात येत आहे. शिवसेनेकडून 3 जानेवारी रोजी अत्यंयात्रा देखील काढली होती. या पार्श्‍वभूमीवर पुणे शहरातील विविध संघटना एकत्रित आज हेल्मेट विरोधी कृती समितीच्या वतीने हेल्मेट सक्तीच्या निषेधार्थ वैकुंठ स्मशानभूमीत दशक्रिया विधी पार पडला.
या सर्व घडामोडी घडत असताना. पुणे महापालिकेत, राज्यात आणि केंद्रात सत्ते मध्ये भाजप असून त्याच पक्षाचे शहर अध्यक्षानी हेल्मेट सक्ती विरोधात भूमिका मांडल्याने आता यावर सत्ताधारी भाजप यावर काय भूमिका घेते हे पाहणे जरुरीचे ठरणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.