Pune : सहकारनगरमध्ये पर्यावरणविषयक चर्चेसाठी ‘जीविधा कट्टा ’

एमपीसी न्यूज- सहकारनगरमध्ये पर्यावरणविषयक चर्चेसाठी ‘जीविधा कट्टा‘ स्थापन करण्यात येत असून, त्याचे उद्घाटन शनिवारी (दि. 25) होणार आहे. अशी माहिती ‘जीविधा’चे संचालक राजीव पंडित यांनी पत्रकाद्वारे दिली.

_MPC_DIR_MPU_II

जीविधाच्या अकराव्या वर्धापनदिनानिमित्त हा कट्टा स्थापन करण्यात येत आहे. सहकारनगर परिसरात हा पर्यावरणविषयक मासिक कट्टा उपक्रम दर महिन्याच्या चौथ्या शनिवारी होईल. या उपक्रमाचे उद्घाटन प्रसिद्ध पक्षीतज्ज्ञ, ‘ईला फाउंडेशन‘चे संस्थापक डॉ. सतीश पांडे यांच्या ‘चिमणी संवर्धन ‘ या विषयावरील व्याख्यानाने शनिवार दिनांक 25 ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसहा वाजता होणार आहे.

मधुमालती सभागृह, पहिला मजला, जनता सहकारी बँकेच्यावर, दशभुजा गणपती मार्ग, तुळशीबागवाले कॉलनी, सहकारनगर नंबर 2. येथे हा उद्घाटन कार्यक्रम होईल. पुणे शहरातील व्यग्र जीवन आणि ट्रॅफिक जॅम सारख्या समस्यांमुळे पर्यावरणाच्या चळवळीत सर्वसामान्यांना सहभागी होणे जमत नाही. त्यामुळे या विषयातील कार्यक्रम शहरातील विविध भागात आयोजित करणे ही काळाची गरज आहे. या दृष्टीने सहकारनगर परिसरात जीविधा कट्टा सुरु करत आहोत. हा उपक्रम सर्वांसाठी व विनामूल्य खुला आहे. परिसरातील निसर्गप्रेमींनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.