Pune : जिल्ह्यात पुरस्थिती कायम; मावळ, मुळशी, भोर, वेल्हा तालुक्यातील शाळांना बुधवारीही सुट्टी

एमपीसी न्यूज – पुणे जिह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. अतिवृष्टीमुळे पुणे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी बुधवारी (दि. 7) पुणे जिल्ह्यातील मावळ, मुळशी, भोर, वेल्हा तालुक्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.

प्रादेशिक हवामान केंदाने गोवा व महाराष्ट्रात मंगळवार (दि. 6) पर्यंत अतिवृष्टीचा इशारा दिला होता. पुणे जिह्यातील मावळ, मुळशी, भोर, वेल्हा तालुक्यांमध्ये शनिवार (दि. 3)पासून अतिवृष्टी होत आहे.

  • अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात कोणतीही अनुचित घटना घडू नये, तसेच शालेय विद्यार्थ्यांना या अतिवृष्टीचा परिणाम होऊ नये यासाठी सोमवारी (दि. 5) आणि मंगळवारी (दि. 6) पुणे जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली. मात्र, पूरस्थिती कायम असल्याने जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी बुधवारी देखील पुणे जिल्ह्यातील चार तालुक्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली.

अतिवृष्टीमुळे सोमवारी (दि. 5) रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली होती. मात्र, अतिवृष्टी कायम असल्याने मंगळवारी (दि. 6) देखील सुट्टी देण्यात आली. त्यानंतरही जिल्ह्यातील चार तालुक्यांमधील पूरस्थिती कायम आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील मावळ, मुळशी, भोर आणि वेल्हा या चार तालुक्यातील सर्व प्री स्कूल, प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.