Pune : ध्वनी प्रदूषण नियंत्रणासाठी नव्या संनियंत्रण समितीची स्थापना

एमपीसी न्यूज – पुणे पोलीस आयुक्त कार्यक्षेत्रात ध्वनी प्रदूषण नियंत्रणासाठी संनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे. यापूर्वीच्या समितीमधील अध्यक्ष व सदस्य यांच्या बदल्या झाल्याने ध्वनी प्रदूषण नियंत्रणासाठी संनियंत्रण समितीची नव्याने स्थापना करण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त मितेश घट्टे यांनी दिली.

ध्वनी प्रदूषण नियंत्रणासाठी नवीन संनियंत्रण समिती पुढीलप्रमाणे –

पुणे शहर पोलीस सह आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे हे अध्यक्ष आहेत. (दुरध्वनी क्रमांक 020-26122784, ई-मेल आयडी [email protected])

सदस्य पुणे शहर परिमंडळ-1 चे पोलीस उप आयुक्त स्वप्ना गोरे (दुरध्वनी क्रमांक 020-24454450, ई-मेल आयडी [email protected])

पुणे शहर परिमंडळ-2 चे पोलीस उप आयुक्त शिरीष सरदेशपांडे (दूरध्वनी क्रमांक 020-26334249/387 ई-मेल आयडी [email protected])

पुणे शहर परिमंडळ-3 चे पोलीस उप आयुक्त पोर्णिमा गायकवाड (दूरध्वनी क्रमांक 020-27487777/226 ई-मेल आयडी [email protected])

पुणे शहर परिमंडळ-4 चे पोलीस उप आयुक्त  पंकज देशमुख (दूरध्वनी क्रमांक 020-26684001, ई-मेल आयडी [email protected])

पुणे शहर परिमंडळ-5 चे पोलीस उप आयुक्त सुहास बावचे (दूरध्वनी क्रमांक 020-26861212, ई मेल आयडी [email protected])

महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी, जे.बी.संगेवार (दूरध्वनी क्रमांक 020-25811694 / 25811627 / 9869440149, ई मेल आयडी  [email protected])

ही समिती पुणे शहरातील ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण ठेवणार आहे. ध्वनी प्रदूषणाशी निगडित सर्व समस्यांचे निराकरण देखील समितीकडून करण्यात येईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.