Pune : महसूल वाढीसाठी स्वतंत्र समितीची स्थापना -हेमंत रासने

एमपीसी न्यूज – पुणे शहराचा विकास करण्यासाठी महसूलात वाढ होणे आवश्यक आहे. त्यासाठी विशेष लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना स्थायी समितीच्या बैठकीत प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. तसेच, महसूल वाढीसाठी स्वतंत्र समितीची स्थापना लवकरच करण्यात येणार आहे, अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी मंगळवारी पत्रकारांना दिली.

महापालिकेला दरवर्षी केवळ चार ते साडे चार हजार कोटी रूपयेच उत्पन्न मिळते. आगामी काळात एक रुपयाचीही करवाढ न करता महसूल वसुलीतील गळती रोखून येत्या वर्षात महसूलात सुमारे १ हजार कोटींची वाढ करण्याचे आदेश महापालिका प्रशासनाला रासने यांनी दिले.

२०१९-२० या आर्थिक वर्षात नोव्हेंबर, २०१९ पर्यंत पालिकेला सुमारे २ हजार ९०० कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे़. लवकरच स्वतंत्र महसूल समिती स्थापन करून त्यामध्ये महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची टीम असेल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.