Pune : कात्रज भागामध्ये इस्टेट एजंटचा कोयत्याने वार खून

एमपीसी न्यूज- पुण्यात कात्रज भागामध्ये एका इस्टेट एजंटचा कोयत्याने वार खून करण्यात आला. ही घटना सोमवारी (दि. 20) रात्री घडली.

अजयकुमार सीताराम जैसवाल (वय 45, रा. कोथरूड) असे खून झालेल्या इस्टेट एजंटचे नाव..

कात्रज परिसरातील सच्चाई माता डोंगरावरील फार्म हाउसमध्ये हा खून करण्यात आला. खून केल्यानंतर आरोपींनी फार्म हाउसचे दरवाजे बाहेरून बंद केले आणि पळ काढला. दरम्यान मालक फोन उचलत नसल्यामुळे शोध घेत नोकर फार्म हाउसवर पोहोचल्यानंतर खुनाचा प्रकार उघडकीस आला.

भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरु आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.