Pune : देवेंद्र फडणवीस उभे राहिले तरी मीच जिंकणार – रविंद्र धंगेकर

एमपीसी न्यूज – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जरी पुण्यातून (Pune) उभे राहिले तरी पुणे लोकसभा मतदारसंघातून आपणच जिंकणार असल्याचा विश्वास आमदार रविंद्र धंगेकर यांनी बोलून दाखविला. आजवर पुणेकर नागरिक माझ्या पाठीशी राहिले आहेत आणि लोकसभा निवडणुकीत देखील माझ्या पाठीशी राहतील, असेही ते म्हणाले.

भाजपतर्फे माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी आमदार जगदीश मुळीक आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सुनील देवधर यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. मात्र, ऐनवेळी देवेंद्र फडणवीस पुण्यातून लोकसभा निवडणूक लढणार असल्याची कुजबुज सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर धंगेकर यांनी दिलेली प्रतिक्रिया महत्वपूर्ण मानली जात आहे.

पुणे लोकसभा निवडणूक देवेंद्र फडणवीस लढविणार अशी चर्चा सुरू आहे. तर, तुम्ही निवडणूक लढविणार का? या प्रश्नावर कसबा विधानसभा मतदार संघाचे काँग्रेस पक्षाचे आमदार रविंद्र धंगेकर म्हणाले, मी 30 वर्षांपासून राजकीय जीवनात आहे. या संपूर्ण कालावधीत कसबा विधानसभा मतदारसंघात विविध प्रभागातून नगरसेवक म्हणून पुणे महापालिकेमध्ये काम करण्याची संधी मिळाली.

Pimple Saudagar : शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने 20 लाखांची फसवणूक

त्या प्रत्येक निवडणुकीत समाजातील सर्व घटकांनी संधी दिल्याने नगरसेवक  (Pune) म्हणून काम करता आले. त्याच दरम्यान मागील वर्षी झालेली कसबा विधानसभा पोटनिवडणुक सर्व सामान्य नागरिकांनी हातामध्ये घेतल्याने मी आमदार झालो आहे.

पुण्यातील ब्राह्मण समाज खूप हुशार आहे. हा समाज काम करणाऱ्यांना संधी देतो. त्यामुळे आगामी काळात जर काँग्रेस पक्षाने आपल्याला संधी दिल्यास आपण लोकसभा निवडणूक जिंकणार असल्याचे धंगेकर यांनी सांगितले. तर, काँग्रेसकडून शहराध्यक्ष अरविंद शिंदे, माजी आमदार मोहन जोशी, ऍड. अभय छाजेड, प्रवक्ते गोपाळ तिवारी यांची तर, मनसेतर्फे माजी नगरसेवक वसंत मोरे आणि साईनाथ बाबर यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.