Pune: लॉकडाऊन संपला तरी, नियम पाळावे लागणार – विक्रम कुमार

Even if the lockdown ends, the rules will have to be followed - Vikram Kumar

एमपीसी न्यूज – पुणे शहरातील लागू केलेला 10 दिवसांचा लॉकडाऊन संपत असला तरी शुक्रवार (दि. 24 जुलै) पासून केंद्र शासनाच्या नियमांचे पालन करावेच लागेल, असा स्पष्ट इशारा पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिला आहे.

पुणे महानगर पालिका हद्दीत कोणत्याही व्यक्तीला अत्यावश्यक सेवा किंवा कारण वगळता रात्री 9 ते पहाटे 5 वाजेपर्यंत बाहेर जाता येणार नाही. 65वर्षे वयोगटापेक्षा जास्त वय असलेल्या, आजारी व्यक्ती, गरोदर महिला, 10 वर्षांपेक्षा कमी वय असलेली मुलं यांना अत्यावश्यक सेवा व आरोग्य विषयक अडचणींशिवाय बाहेर जाता येणार नाही. 24 जुलैपासून पुढील आदेश मिळेपर्यंत हे आदेश कायम असणार आहेत, असे आयुक्तांनी आदेशात म्हटले आहे.

प्रतिबंधित क्षेत्रात विशिष्ट गल्ली, चाळ, वसाहत, इमारती, गृह निर्माण संस्था या ठिकाणी पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आढळल्यास त्या कार्यक्षेत्राचे सहाय्यक आयुक्त, सनियंत्रण अधिकारी हे ते विशिष्ट क्षेत्र, विभाग, चाळ, इमारत किंवा गृहनिर्माण सोसायटी लगेच सील करणार आहेत.

पुणे महापालिकेची अत्यावश्यक सेवा देणारी सर्व प्रकारची वाहने यांना कोणत्याही पासची आवश्यकता राहणार नाही. पाण्याचे टँकर, रुग्णवाहिका, शववाहिका, अग्निशमन दलाचे वाहन, कचरा वाहतूक गाडी आणि त्यावरील कर्मचारी, अधिकारी – कर्मचारी यांना प्रतिबंधित क्षेत्रात केव्हाही प्रवेश करता येईल. प्रतिबंधित क्षेत्रात अत्यावश्यक वस्तूंची दुकाने, किराणा, भाजीपाला, विक्री, औषध विक्री, दवाखाने, दुध विक्री, रेशन दुकान, सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. तर, प्रतिबंधित क्षेत्राबाहेर मॉल आणि व्यापारी संकुल वगळता सर्व व्यापारी क्षेत्रे, रस्त्यांवरील दुकाने पी -1 आणि पी – 2 पध्दतीने सुरू राहणार आहेत. हे व्यवसाय सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत अटींसह सुरू राहणार आहेत. 1 जुलै रोजी 109 कंटेन्मेंट झोन होते. त्यामध्ये आता पुनर्रचना करून ही संख्या 87 करण्यात आली आहे.

कोविड केसेस जसजशा वाढत गेली तसतशा कंटेनमेंट झोनमध्ये वाढ कशी झाली

2 जून: 63

16 जून: 73

24 जून: 74

1 जुलै: 109

23जुलै: 87

23 जुलै रोजी आदेशानुसार प्रभाग कार्यालये व सूक्ष्म कंटेनमेंट झोनची संख्या

कसबा-विश्रामबागवाडा – 06

भवानी पेठ – 02

ढोले पाटील रस्ता – 04

धनकवडी-सहकारनगर -07

बिबवेवाडी – 04

येरवडा – 04

वानवडी-रामटेकडी – 10

शिवाजीनगर -. 08

वडगाव शेरी – 02

सिंहगड रस्ता –  05

हडपसर – 08

कोंढवा – 04

वारजे-कर्वेनगर – 09

कोथरूड – बावधन – 8

औंध-बाणेर – 05

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.