Pune: जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने पीएम केअर्स फंडाला किमान 100 रुपयांची मदत द्यावी – भाजप

वडगाव मावळ – मावळ तालुक्यातील भाजपाच्या कार्यकर्त्यांनी तसेच नागरिकांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हाकेला साथ देत पंतप्रधान केअर्स फंडासाठी आर्थिक मदत द्यावी. असे आवाहन भाजपाचे जिल्हा अध्यक्ष गणेश भेगडे व सरिचटणीस अविनाश बवरे यांनी पत्रकाद्वारे केले आहे. 

कोरोना विषाणूच्या विरोधात आपल्याला लढाई जिंकायची आहे. याचा एक भाग म्हणून भाजपाचे कार्यकर्ते व नागरिकांनी ही मदत करायची आहे. आपण किती मदत केली याला महत्व नसून किती मोठया संख्येने सहभागी झालो हे महत्त्वाचे आहे. असे भेगडे व बवरे म्हणाले.

_MPC_DIR_MPU_II

कोरोना विषाणूच्या विरोधात आपल्याला लढाई जिंकायची आहे, या प्रयत्नाचा भाग म्हणून माझी आपणा सर्व भाजप कार्यकर्ते व नागरिकांना विनंती आहे की, आपण कमीत कमी 100 रुपये एवढी रक्कम मदत पंतप्रधान केअर्स फंड  (PM Cares Fund) या खात्यामध्ये द्यावी. चला आदरणीय मोदीजींच्या हाकेला साथ देऊया, आपले योगदान आपण आरटीजीएस (RTGS), एनईएफटी   (NEFT) तसेच गूगल पे, फोन पे, पेटीएमद्वारेही देता येईल. तसेच, या प्रक्रियेतून मदत देणे शक्य नसल्यास प्रत्येक गावच्या स्थानिक भाजपा अध्यक्षांकडे मदत जमा करावी. ती एकत्रितपणे पंतप्रधान केअर फंडामध्ये जमा करण्यात येईल, असे पत्रकात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.