Pune : पारशी समाजाविषयी माहिती देणाऱ्या कलाकृतींचे चित्रप्रदर्शन

एमपीसी न्यूज – पारशी समाजाविषयीचे प्रदर्शन, भारताचा झरोष्ट्रीयन, त्यांचा इतिहास, त्यांची संस्कृती जीवनपट आणि धर्म यांचे चित्रकलेच्या माध्यमांतून प्रदर्शन भरले आहे. या प्रदर्शनाचे उदघाटन फोर्ब्स मार्शल ग्रुपचे अध्यक्ष फराहाद फोर्ब्स यांच्या हस्ते करण्यात आले.

या चित्रकलेच्या प्रदर्शनाचे उद्देश सांगताना अशोक कुमार म्हणाले, या चित्रकलेच्या माध्यमांतून आणि प्रदर्शनांतून प्राचीन, जुन्या संस्कृतीचे, समाजाचे, दृष्यमान जागृत ठेवणे हा या प्रदर्शनाचा उद्देश आहे. झरोष्ट्रीयन यांच्या प्रदर्शनामध्ये ४५ कलाकृती असून त्या चित्रकलेच्या प्रदर्शनांतून जागृत ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.

झरोष्ट्रीयन यांनी काढलेल्या मूर्तीमध्ये शाश्वत आणि बोलके असून समाजात संवाद घडवून आणण्यासाठी करणारे आहेत. हे चित्रकला प्रदर्शन भारत देशामध्ये वेगवेगळ्या शहरांत केले जाणार असून त्यात महान तत्वज्ञानी झरोष्ट्रीयन यांच्या कार्याची जाणीव करुन देण्यासाठी उपयोगाची ठरणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.