Pune : कोरोना नियंत्रणासाठी पाच महिन्यात केलेल्या खर्चाचा अहवाल द्यावा : दीपक मानकर

महापालिका सर्वसाधारण सभेत मानकर यांनी ही मागणी केली. : Expenditure incurred for corona control should be reported in five months: Deepak Mankar

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील 4 ते 5 महिन्यांत महापालिका प्रशासनाने केलेल्या खर्चाचा अहवाल आयुक्तांनी तातडीने सभागृहात द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे जेष्ठ नगरसेवक दीपक मानकर यांनी केली आहे.

महापालिका सर्वसाधारण सभेत मानकर यांनी ही मागणी केली. पुणे शहरात कोरोनाचे संकट वाढत असताना प्रशासनाने नेमक्या काय उपाययोजना केल्या, त्याचा अहवाल ठेवण्याची मागणी नगरसेवक वारंवार करीत आहेत.

कोरोनाच्या या काळात महापालिका प्रशासनानेही चांगले काम केले आहे. तो वादाचा मुद्दा नाही, त्याचे कोणीही राजकारण करू नये. कोरोना रुग्णांची संख्या वारंवार वाढत आहे. त्यामुळे पुणेकरांनी मास्क लावणे, फिजिकल डिस्टनसिंग पाळणे, सॅनिटायजरचा वापर करावा, असे आवाहनही दीपक मानकर यांनी केले आहे.

अर्थव्यवस्था सुरळीत करण्यासाठी लॉकडाऊन शिथिल करण्यात आला आहे. तर, जुलै महिन्याच्या मुख्य सभेत सर्व नगरसेवकांना ऑगस्ट महिन्याच्या सभेत बोलण्याची संधी देणार असल्याचे महापौरांनी सांगितले होते, त्याचे काय झाले, असा सवाल महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या दीपाली प्रदीप धुमाळ यांनी उपस्थित केला.

पुणे शहरात कोरोनाच्या रुग्णांना व्हेंटिलेटर, ऑक्सिजन बेड मिळत नसल्याचा आरोप मनसेचे गटनेते वसंत मोरे आणि नगरसेवक साईनाथ बाबर यांनी केला. दरम्यान, मनसेच्या नगरसेवकांना महापौर मुरलीधर मोहोळ वारंवार खाली बसण्याची विनंती करीत होते.

तर पुणे शहर व्हेंटिलेटरवर आहे. आम्हाला बोलू द्या, आमचा तहकुबिला विरोध आहे, असे शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार म्हणाले. कोरोनामुळे कामकाज करायला अडचण असल्याने माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले.

राज्य शासनाचे आदेश आहेत, त्यामुळेच सर्वसाधारण सभा घेता येत नाही. शासनाच्या आदेशाचा भंग होत असल्याचे स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने म्हणाले.

कोरोनाच्या संकट काळात अव्वाच्या सव्वा बिले आकारली जात आहेत. त्यावर म्हपालिक प्रशासनाला खुलासा करू द्या, अशी मागणी वसंत मोरे यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.