Pune : भगवद्गीता अनुभवताना…पुस्तकाचे प्रकाशन संपन्न

एमपीसी न्यूज : ज्येष्ठ साहित्यिक राज अहेरराव लिखित (Pune) आणि संवेदना प्रकाशन निर्मित ‘भगवद्गीता अनुभवताना…’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी भगवद्गीतेत सर्व प्रश्नांची उत्तरे सापडतात, असे विचार ज्येष्ठ साहित्यिक दत्तात्रय अत्रे यांनी व्यक्त केले.
श्रीनृसिंह सरस्वती देवस्थान – लाडकांरजाचे शरद पवार, जलसंपदा विभाग स्थापत्य अभियंता रमेश मगर, गांधीबाग सहकारी बँक – नागपूरचे व्यवस्थापक प्रशांत फुके, न्यू इंडिया इन्शुरन्स – पुणेचे वरिष्ठ व्यवस्थापक अनिल शिंदे, डॉ. प्रवीण गांजरे, माजी नगरसेविका शर्मिला बाबर, रजनी अहेरराव, प्रकाशक नितीन हिरवे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती; तसेच माजी उपमहापौर शैलजा मोरे यांच्यासहशहरातील सामाजिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रांतील मान्यवरांची सभागृहात उपस्थिती होती.
Shirgaon : क्रिकेट मॅचवर बेटिंग घेणाऱ्या चौघांना अटक
दत्तात्रय अत्रे पुढे म्हणाले की, “बी पेरताना जमिनीच्या ओली अन् खोलीचा अंदाज घेतला जातो. अध्यात्मातील वाटचाल ही सुद्धा अशीच असते. सतारीची छेडलेलीतार जशी उत्कट आनंदाची अनुभूती देते; तशीच अनुभूती अध्यात्मातून मिळते. ‘भगवद्गीता अनुभवताना…’ या पुस्तकातून सांख्य, भक्ती, ध्यान, राज अशा विविधयोगांचा परिचय होतो.
मंगेश पोहणेकर, अजय हेडावू, नंदकुमार मुरडे, पी. बी. शिंदे, संपत शिंदे, अश्विनी कुलकर्णी, अनिकेत गुहे, राजेंद्र घावटे, माधुरी ओक आणि नवयुग साहित्य वशैक्षणिक मंडळाच्या सदस्यांनी संयोजनात परिश्रम घेतले. प्रा. तुकाराम पाटील यांनी सूत्रसंचालन केले. स्वप्निल अहेरराव यांनी आभार मानले.