Pune : एकात्मता दिनानिमित्त पोलिसांना आभार पत्र देऊन कृतज्ञता व्यक्त

टीजेएसबी कर्मचारी संघटना व भारतीय मजदूर संघाचा उपक्रम

एमपीसी न्यूज – करोना विषाणूला आटोक्यात आणण्यासाठी केंद्र सरकारसह राज्य सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहेत. या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलीस, डॉक्टर्स, साफ-सफाई कर्मचारी दिवस रात्र कर्तव्य बजावत आहेत. त्यांच्या प्रयत्नांना पाठबळ म्हणून भारतीय मजदूर संघ, प्रणित टीजेएसबी सहकारी बँक अधिकारी कर्मचारी संघटनेने 22 एप्रिल हा दिवस “एकात्मता दिवस” म्हणून साजरा केला. कोरोना विरुद्ध बाहेर जे लढत आहेत व सेवा पुरवत आहेत अशा योद्ध्याना आभार पत्र देऊन या लढाईत आपण सगळे सोबत आहोत हा विश्वास दिला.

संघटनेच्या पुणे व पिंपरी चिंचवड मधील सर्व सदस्यांनी पुण्यातील वेगवेगळ्या पोलीस चेक पोस्ट जसे, शिवाजी पुतळा चौक, डहाणूकर चौक, वारजे नाका चेक पोस्ट तसेच पिंपरी चिंचवड मधील पिंपरी पोलीस स्टेशन, रावेत पोलीस चेक पोस्ट, विश्रांतवाडी मेन जंकशन, येरवडा मेन पोलीस स्टेशन, वडगाव ब्रिज चेक पोस्ट, नांदेड फाटा, सिंहगड रोड, चाकण हायवे कंट्रोल जंकशन, दापोडी पोलीस चेक पोस्ट, शिमला ऑफिस चेक पोस्ट वर जाऊन पोलीस योद्ध्याचे आभार पत्र देऊन आभार मानले व पाणी बॉटल, सॅनीटायझर बॉटल्स, ड्रायफ्रुटस देऊन कृतज्ञता व्यक्त केली.

बँकर देखील मोठी जोखीम पत्करून एक अत्यावश्यक सेवा म्हणून समाजहित जपत आहेत. त्यामुळे बँकेच्या प्रत्येक शाखेतील सर्व कर्मचाऱ्यांसाठी सोशल डीस्टनसिंगच्या नियमांचे पालन करीत कर्मचाऱ्यांनी टाळ्या वाजवून धन्यवाद देण्यात आले. टिजेएसबी स्टाफ संघटनेचे उपाध्यक्ष, व नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ को. ऑप. बँक एम्पोलॉइज संघटनेचे महामंत्री शरद जाधव यांनी सर्वांचे आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.