Pune : महापालिकेच्या विकासकामांना 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ -मुरलीधर मोहोळ

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेच्या विकासकामांना दि. 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

20 मार्चपूर्वी वर्क ऑर्डर असलेल्यांना 30 एप्रिलपर्यंत विकासकामांना मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला. यासंदर्भात महापौर मुरलीधर मोहोळ आणि महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांची चर्चा झाली. यासंदर्भातील आदेश थोड्याच वेळात काढले जाणार आहे.

तर, 31 मार्च अखेर कामांची बिले ऑडिटला सादर करण्याचा खातेप्रमुखांनी घाट घातला होता. सध्या कोरोनापेक्षा बजेट खर्ची पडण्यावर जोर देण्यात येत होता.

मनपा मुख्य भवन ऑडिट डिपार्टमेंट आणि सर्व क्षेत्रिय कार्यालये व पाच उपायुक्त यांचे कार्यालयात ठेकेदारांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.