Pune : महिलेची छायाचित्रे प्रसारीत करण्याची धमकी देत उकळली खंडणी,भोंदू विरोधात गुन्हा दाखल 

एमपीसी न्यूज – गुंगीचे औषध देऊन महिलेची छायाचित्रे काढून ती प्रसारीत ( Pune ) करण्याची धमकी देत महिलेकडून खंडणी उकळण्यात आली आहे. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी एका भोंदू बाबा विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

कृष्णनारायण तिवारी (वय 30), अंतिमा कृष्णा तिवारी (दोघे रा. शक्तीनगर, गौंडा, उत्तर प्रदेश) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या बाबत एका महिलेने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Pimpri : ज्येष्ठ कवी फ. मुं. शिंदे यांच्या ‘त्रिकाल’ काव्यसंग्रहाचे 17 मे रोजी प्रकाशन

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या एका परिचितामार्फत  आरोपींच्या संपर्कात आल्या . आरोपींना घरावर कोणीतरी काळी जादू केली आहे. काळी जादू नष्ट करण्यासाठी विधी करावा लागेल, अशी बतावणी केली. त्यानंतर तिवारी महिलेच्या घरी गेला. आरोपींनी महिला आणि तिच्या लहान मुलीला सरबत प्यायला दिले. त्यानंतर तिला गुंगी आली. आरोपींनी महिलेची मोबाइलवर छायाचित्रे काढली.

त्यानंतर आरोपींनी महिलेशी पुन्हा संपर्क साधला. महिला आणि मुलीची छायाचित्रे समाजमाध्यमात प्रसारित करतो, अशी धमकी दिली. महिलेकडून आरोपींनी वेळोवेळी पैसे उकळले. तिच्याकडून दागिने घेतले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पतंगे ( Pune ) तपास करत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.