Pune : विनापरवानगी विदेशात जाणाऱ्या तीन अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे अतिरिक्त आयुक्तांचे संकेत

एमपीसी न्यूज – अस्ट्रेलियालात विनापरवानगी दौरा करणाऱ्या पुणे महापालिकेच्या 3 अधिकार्यांवर कठोर कारवाई करण्याचे संकेत अतिरीक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दिले आहेत. हा दौरा ठेकेदाराच्या पैशातून करण्यात आल्याचा आरोप काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी केला. विदेशातून आल्यावर या अधिकाऱ्यांची आरोग्य तपासणी का करण्यात आली नाही.

सध्या पुणे शहरात कोरोनाचे मोठे संकट आहे. या अधिकाऱ्यांची आम्हाला नावे कळाली तर त्यांच्याकडे जाता येणार नाही. आम्ही सावध होऊ, असे विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ म्हणाल्या. तर, कोरोनाचे संकट असताना हे अधिकारी विदेशात गेलेच कसे, असा सवाल नगरसेविका नंदा लोणकर यांनी उपस्थित केला. हे प्रकरण गंभीर असून त्याचा खुलासा करण्याची मागणी शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी केली.

दरम्यान, या 3 अधिकाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांच्यावर काय कारवाई केली, याची माहिती सर्वसाधारण सभेत देण्यात येणार असल्याचे रुबल अग्रवाल यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.