Pune : प्रचंड उकाड्यामुळे पुणेकर हैराण.. हडपसर,वडगाव शेरी आणि कोरेगाव पार्क येथे तापमान 43 अंश सेल्सिअसच्या पुढे

जिल्ह्यातील सर्व भागात कमाल तापमानात वाढ

एमपीसी न्यूज –या आठवड्यात राज्यातील काही ठिकाणी अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली असली तरी राज्यात अवकाळीचे ढग गायब झाले असून कमाल तापमानात (Pune) वाढ होत असताना दिसून येत आहे.

आज दि. (18 एप्रिल) रोजी पुणे  शहरात  41 अंश सेल्सिअस  तापमानाची नोंद झाले असून पिंपरी-चिंचवड उपनगरात 42 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याची कळते. पुणे जिल्ह्यात  हडपसर  येथे सर्वाधिक 43.5 अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले असून, लोणावळा येथे  36.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालेली आहे.

शहरातील  बहुतांश भागात 40 अंशाच्या पुढे तापमान (Pune) असल्याचे दिसून येत असल्यामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. जिल्हयातील सर्व भागात तापमानात वाढ झाल्यामुळे रस्त्यांवरील लोकांची गर्दी कमी झाल्याची दिसून येते. आज  वडगाव शेरी येथे 43.1, कोरेगाव पार्क 43.0, शिरूर 42.8, तळेगाव ढमढेरे -42.7, राजगुरुनगर 42.7, मगरपट्ट्यात 42.4, खेड 42.4 आणि  चिंचवड येथे 42.0  अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुढील काही दिवस तापमानात वाढ कायम राहून उकाडा कायम राहील  असे वर्तवण्यात आले आहे.

 

शहर परिसरातील तापमान पुढीलप्रमाणे 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.