Pune : राष्ट्रवादी डॉक्टर सेलच्या वतीने पुण्यातील 15 हजार डॉक्टरांना फेसशिल्ड

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणू विरूद्ध लढण्यात पुढे असणाऱ्या डॉक्टर समुदायाला मदत करत राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या वतीने आज (रविवारी) पुण्यातील 15 हजार डॉक्टरना फेसशिल्ड देण्यात आले. हा कार्यक्रम साई स्नेह हॉस्पिटल, कात्रज येथे पार पडला.

राष्ट्रवादी कॉंग्रेस डॉक्टर्स सेलचे शहराध्यक्ष डॉ. सुनील जगताप यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. आमदार चेतन तुपे, आमदार सुनील टिंगरे, पालिकेतील विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ तसेच राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांच्या हस्ते फेसशिल्डचे वितरण करण्यात आले.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, डॉक्टर सेल प्रदेशचे अध्यक्ष डॉ.नरेंद्र काळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्ट तर्फे राज्यात डॉक्टर्स आणि आरोग्य सेवकांना दीड लाख फेसशिल्डचे वितरण केले जात आहे.

कोरोना विषाणूच्या संकट काळामध्ये वैद्यकीय सेवा ही आपली युद्धभूमी समजून धैर्याने सेवा देत आहेत अशा सर्व डॉक्टरांना फेस शिल्ड देण्यात येत आहे. पुण्यात 16 वैद्यकीय संघटनामार्फत फेसशिल्डचे वितरण करण्यात येणार आहे, असे डॉ. सुनील जगताप यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.