Pune : कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर 3 हजार बेड्सची सोय : आयुक्त

Facility of 3000 beds against the backdrop of increasing number of corona patients: Commissioner ;करोनाग्रस्त रुग्णांची संख्या 25 हजारांहून जास्त

एमपीसी न्यूज – पुणे शहरात वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर 3 हजार बेड्सची सोय करण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली.

वाघोली, बालेवाडी, सणस मैदान आणि हडपसर येथील ग्लायडिंग सेंटर या चार ठिकाणी मिळून तीन हजार बेडची व्यवस्था करण्यात येणार आहे. शहरात करोनाग्रस्त रुग्णांची संख्या 25 हजारांहून जास्त आहे. रोज 4 हजार 500 कोरोनाच्या चाचण्या करण्यात येत आहेत. त्यामुळे रुग्ण वाढतेच आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी कौन्सिल हॉलमध्ये बैठक झाली. या बैठकीत पवार यांनी कोरोनाचे संकट आटोक्यात आणण्यासाठी अनेक सूचना केल्या.

कोरोना चाचण्या वाढविण्यात आल्याने रोज 1 हजार पेक्षा जास्त रुग्ण आढळून येत आहेत. लॉकडाउनच्या काळात बाधित रुग्णांच्या संपर्कात येणार्‍या व्यक्तीची तपासणी करून 24  तासाच्या आत रिपोर्ट देण्यावर लक्ष असणार आहे. त्यामुळे बाधित रुग्णांची संख्या नियंत्रणात येण्यास मदत होईल.

पुणे शहरात अनेक रुग्णालयामध्ये बेड मिळत नसल्याच्या तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे 600 ऑक्सिजन बेड पुढील आठ दिवसात उपलब्ध करून देणार असल्याचे आयुक्त म्हणाले.

10 दिवस कडक लॉकडाऊन होणार असल्याने नागरिकांना आता घरातच राहावे लागणार आहे. लॉकडाऊन शिथिल केल्याने मोठ्या प्रमाणात वर्दळ वाढली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like