Pune : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पी ए बोलतो आहे असे सांगत ससून हॉस्पिटलच्या डीन यांना फेक कॉल

एमपीसी न्यूज :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पी. ए. बोलतो आहे, असे सांगत पुण्यातील ससून हॉस्पिटलच्या डीन यांना फेक कॉल आल्याचा धक्कादाक प्रकार समोर आला आहे. ससूनमध्ये सुरु असलेल्या मेसचे दुसरे टेंडर भरा, असा आदेश देणारा हा फोन होता. (Pune) या फोननंतर काही वेळासाठी ससून रुग्णालयात खळबळ उडाली होती. ससून हॉस्पिटलचे डीन डॉ. संजीव ठाकूर यांना लॅन्डलाईनवर हा फोन आला होता.

“मी मुख्यमंत्र्यांचा पीए बोलतो आहे. ससूनमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या आरक्यू मेस बंद करा आणि तातडीने दुसरे टेंडर प्रक्रिया भरा” असा आदेश असलेला कॉल ससून हॉस्पिटल चे डीन डॉ संजीव ठाकूर यांना आला.

मनोबोध : मनाचे श्लोक क्रमांक 88-बहु चांगले नाम या राघवाचे

जवळपास 5 ते 6 मिनिटं हा कॉल सुरू होता. दरम्यान, अधिष्ठाता कार्यालयात हा फोन आला आणि समोरच्या व्यक्तीने डॉ संजीव ठाकूर यांना मोठ्या रुबाबात सूचना आणि (Pune) आदेश देण्यास सुरुवात केली. मात्र संशय आल्याने जेव्हा या बाबत मुख्यमंत्री कार्यालयाशी संपर्क साधला असता असा कुठला ही आदेश दिल्या नसल्याचे कळले आणि हा काल फेक असल्याची खात्री झाली

या प्रकरणी वेळ वाया न घालवता रुग्णांची सेवा महत्त्वाची असल्याचे सांगत अधिष्ठाता कार्यालयाकडून अद्याप कुठली ही तक्रार देण्यात आलेली नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.