_MPC_DIR_MPU_III

Pune : युट्युबवरील व्हिडीओ पाहून 200 च्या बनावट नोटा तयार करणारा तरुण गजाआड

एमपीसी न्यूज- युट्युबवरचे व्हिडिओ पाहून देहूरोड येथील एका 21 वर्षीय तरुणाने 200 रुपयांच्या बनावट नोटा तयार केल्या खऱ्या, पण त्याचा हा धंदा जास्त काळ नाही चालला. सुगावा लागताच पोलिसांनी त्याला सापळा रचून बेड्या ठोकल्या.

_MPC_DIR_MPU_IV

सोहेल सलीम शेख (वय 21, रा.गांधीनगर वस्ती, देहूरोड) असे आरोपीचे नाव आहे.

_MPC_DIR_MPU_II

गुन्हे शाखेच्या युनिट चारचे पोलीस कर्मचारी शंकर सपते यांना आरोपी मंगळवार पेठेतील नरपतगिरी चौकातील एका दुकानात बनावट नोटा घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सापळा रचून त्याला अटक केली. त्याच्या अंगझडतीतून 200 रुपयांच्या सात बनावट नोटा सापडल्या. त्यानंतर पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

आरोपीने युट्युबवरील व्हिडिओ पाहून या बनावट नोटा तयार केल्याचे सांगितले. याकरिता त्याने एक प्रिंटर विकत घेतला. आणि 200 रुपयाची नोट स्कॅन करून त्याची कलर प्रिंटवर कॉपी काढून बनावट नोटा तयार केल्या. त्याने या नोटा छोट्या आणि वृद्ध दुकानदारांकडे काही वस्तू घेत त्यांना दिल्या आणि बाकी पैसे परत घेतले. समर्थ पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.