Pune : लष्करात भरती करण्याचे आमिष दाखवत तरुणांना लुटणाऱ्या तोतया अधिका-यास अटक

एमपीसी न्यूज – आर्मी इंटलिजेस मधील रेकॉर्ड ऑफिसमध्ये कार्यरत असल्याचे सांगत आर्मी मधील ए. ओ.सी सिकंदराबादमध्ये नोकरी लाऊन देतो असे असा बनव करत बनावट नियुक्तीपत्र देऊन तरुणांना मोठ्या प्रमाणात गंडा घालण्यात आला.

Pimpri : पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनच्या वतीने वकिलांसाठी आरोग्य शिबीर

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, आरोपीने स्वतःचे बनावट आयकार्ड दाखवून फिर्यादी व त्याच्या मित्रांकडून12 लाख 80 हजार रुपये रोख व ऑनलाईन स्वीकारून फसवणूक केल्याचा गुन्हा वानवडी पोलिसात दाखल करण्यात आला होता. त्यानुसार गुन्ह्याचा तपास करताना आरोपी रणजीत कुमार राजेंद्र सिंघ ( वय 34 ) रा.कोइमत्तुर , तामिळनाडू, हा साळुंखे विहीर रोड येथे राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

पोलिसांनी सापळा रचून संबंधित ठिकाणी जाऊन आरोपीस ताब्यात घेतले. चौकशी करताना आरोपीने गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून तीन एअर गण, त्याच्या कॅप्सूल, आर्मीचे बनावट ओळखपत्र, गणवेश, जप्त करण्यात आला आहे. तसेच लॅपटॉप, बनावट रबरी स्टॅम्प, सेवापत्र, पेन ड्राईव्ह, मोबाईल असा एकूण 1 लाख 6 हजाराचा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आला आहे. फसवणुकीच्या गुन्ह्याचे गांभीर्य पाहता त्वरित कार्यवाही करण्याचे आदेश वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पठारे यांनी दिले होते. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उप निरीक्षक अजय शितोळे करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.