Pune : ‘फास्टॅग’ कायद्यात सुधारणा व्हावी- चेतन तुपे-पाटील;  ‘फास्टॅग’चे स्टीकर अद्यापही उपलब्ध नाही

एमपीसी न्यूज – केंद्रीय वाहतूक मंत्रालयाने ‘फास्टॅग’ कायदा अंमलात आणला आहे. सरकारने कायदा करत असताना ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ हा उद्देश समोर ठेवला पाहिजे. हा कायदा महामार्गावर धावणाऱ्या वाहनांसाठी असून सर्वच वाहने महामार्गावर धावत नसतात. महामार्गावरून धावणाऱ्या वाहनांसाठी फास्टॅग बंधनकारक केले आहे. मात्र, अर्ज भरून एक महिना होऊनही ‘फास्टॅग’चे स्टीकर अद्यापही उपलब्ध झालेलं नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे आमदार चेतन तुपे-पाटील यांनी नाराजी व्यक्त केली.

रविवारी (दि. 15 डिसेंबर 2019) मुदत संपल्यानंतर महामार्गाने प्रवास करणाऱ्या वाहनांना या कायद्यानुसार वाहनधारकांकडे फास्टॅग नसेल तर त्यांना दंड आकारण्याची तरतूद या कायद्यामध्ये करण्यात आलेली आहे. फास्टॅग कार्ड उपलब्ध न झाल्याने अनेक टोल नाक्यांवर 5.5 किलोमीटर लांबीपर्यंत वाहनांच्या रांगा लागत आहेत. त्यामुळे महामार्गावर प्रचंड वाहतूककोंडी निर्माण होत आहे.

अमेरिकेसारख्या देशातही असा कायदा लागू असून एक रांग टोल भरणाऱ्यांसाठी असते. तशी व्यवस्था महाराष्ट्रात सुद्धा कराण्याचा विचार सरकारने करावा. त्याचबरोबर फास्टॅग कार्ड घेण्यासाठी 750 रुपये भरूनही वेळेत कार्ड मिळत नाही.

तंत्रज्ञानाचा वापर करून गोष्टीं सोप्या केल्या पाहिजे. नागरिकांची गैरसोय होता कामा नये, याकरिता या कायद्यात सुधारणा व्हावी आणि सर्व सामान्य व्यक्तींची या कायद्यातून सुटका व्हावी, अशी विनंती करत चेतन चुपे यांनी औचित्याचा मुद्दा विधिमंडळ सभागृहात उपस्थित केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.