Pune: कोरोना झाल्याची माहिती नातेवाईकांना दिल्याच्या रागातून मित्रावर जीवघेणा हल्ला

Pune: Fatal attack on a friend out of anger after informing relatives about Corona आरोपीला कोरोना झाल्याचे समोर आल्यानंतर त्याच्यावर 12 जुलै पर्यंत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्याला होम क्वारंटाइन करण्यात आले आहे.

एमपीसी न्यूज- कोरोना झाल्याची माहिती नातेवाईकांना दिल्याच्या रागातून एका होम क्वारंटाइन रुग्णाने मित्रावरच जीवघेणा हल्ला केला आहे. पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी एका 23 वर्षीय तरुणाने फिर्याद दिली असून आरोपी तरुणावर विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की तक्रारदार तरुण घरी जात असताना आरोपी त्याच्याजवळ आला. फिर्यादी तरुणाने त्याच्या नातेवाईकांना कोरोना झाल्याची माहिती दिली असा त्याचा समज होता. याच रागातून त्यांना मारहाण करत डोक्यात काचेची बाटली फोडली. तसेच त्याला दगडाने ही मारहाण केली.

दरम्यान, आरोपीला कोरोना झाल्याचे समोर आल्यानंतर त्याच्यावर 12 जुलै पर्यंत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्याला होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. हा कालावधी संपल्यानंतर त्याच्यावर पुढील कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.