Pune : नॅशनल फार्मास्युटिकल कॉंग्रेसमध्ये फातिमा मुजावर यांना पारितोषिक

एमपीसी न्यूज- चेन्नई येथे झालेल्या नॅशनल फार्मास्युटिकल कॉंग्रेसमध्ये झालेल्या राष्ट्रीय वक्तृत्व स्पर्धत फातिमा मुजावर यांना विशेष उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले.

फातिमा मुजावर या महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या अल्लाना कॉलेज ऑफ फार्मसी च्या बी. फार्म अभ्यासक्रमाच्या विद्यार्थिनी आहेत. ‘ आरोग्य क्षेत्रात नियंत्रकाची भूमिका ‘ या विषयावर ही वक्तृत्व स्पर्धा 21 डिसेंबर रोजी झाली. देशभरातून 35 स्पर्धकांनी भाग घेतला. प्राचार्य किरण भिसे यांनी अभिनंदन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.