Pune : छावा स्वराज्य सेनेच्या वतीने दामिनी पथकाचा गौरव

एमपीसी न्यूज- छावा स्वराज्य सेनेच्या वतीने पुणे पोलीस आयुक्तालयांतर्गत महिलांच्या रक्षणासाठी तसेच सेवेसाठी स्थापन केलेल्या महिला दामिनी पथकातील महिलांच्या उत्तम कामगिरीची दखल घेऊन छावा स्वराज्य सेनेच्या वतीने त्यांना सन्मानपत्र आणि स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

पुणे पोलीस आयुक्तालय येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात पोलीस निरीक्षक विजया कारंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वाती केदारी, पोलीस उपनिरीक्षक प्रिया टिळेकर व 37 रणरागिणींचे दामिनी पथक उपस्थित होते. शहरातील महिलांच्या बाबतीत होत असलेल्या गुन्ह्यांच्या घटना रोखण्यासाठी तयार करण्यात आलेल्या विशेष प्रशिक्षित महिला पोलिसांचे दामिनी पथक वाढत्या गुन्ह्यांना आळा घालण्यात यशस्वी झाल्याचे पोलीस निरीक्षक विजया कारंडे यांनी यावेळी सांगितले. रस्त्यावरून जाताना महिला व मुलींना होणारा रोडरोमिओंचा त्रास बऱ्यापैकी आटोक्यात आला असल्याचं यावेळी त्यांनी नमूद केलं.

या कार्यक्रमात छावा स्वराज्य सेनेचे संस्थापक अध्यक्ष राम घायतिडक(पाटील), प्रदेश अध्यक्ष राजेंद्र पडवळ, प्रदेश कार्याध्यक्ष आरिफ शेख तसेच पुणे शहर अध्यक्षा मेघा कदम आणि पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष सौरभ सगर तसेच सेनेचेे सर्व प्रमुखपदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सेनेचे सांस्कृतिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष जितेंद्र वाईकर यांनी केले तर संयोजन प्रदेश महिला अध्यक्ष शीतल हुलावळे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.