Pune : गुरुनानक जयंतीनिमित्त उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार

एमपीसी न्यूज- शीख धर्माचे संस्थापक श्री गुरुनानक देवजी यांच्या 550 व्या जयंती निमित्त गुरुद्वारा गुरुनानक दरबार येथे समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला.

यावेळी हरमिंदरसिंग घई , गुरुद्वारा गुरुनानक दरबारचे अध्यक्ष चरणजितसिंग सहानी, संतसिंग मोखा व विक्की ऑबेरॉय व अन्य मान्यवर उपस्थित होते

_MPC_DIR_MPU_II

या कार्यक्रमात मुन्नवर पिरभाई, फादर मस्किटा, मनजितसिंग विरदी फाऊंडेशनचे अध्यक्ष मनजितसिंग विरदी, नीलकंठ ज्वेलर्सचे दिलबाग सिंग, दयासिंग दुप्पर, हरभजनसिंग बिंद्रा आदींना समाजभूषण पुरस्कार म्हणून स्मृतिचिन्ह व शाल देऊन सन्मानित करण्यात आले तसेच सरदार रामेदरसिंग राणा, रविंद्रसिंग मारवा यांना मरणोत्तर समाजभूषण पुरस्कार देण्यात आला .

मनजितसिंग विरदी फाऊंडेशन हे विशेष मुलासाठी काम करणारी सामाजिक संस्था असून विविध सामाजिक संस्थांमधील अनाथ, अपंग, मतिमंद व कॅन्सरग्रस्त मुलांना मोफत चित्रपटाचे आयोजन, शैक्षणिक साहित्य वाटप, कपडे वाटप असे उपक्रम राबवते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.