Pune : ससून रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून महिला डॉक्टरचा आत्महत्येचा प्रयत्न

एमपीसी न्यूज : ससून रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून (Pune) महिला डॉक्टरने खाली उडी मारली. गंभीर जखमी झालेल्या या महिला डॉक्टरवर उपचार सुरू असून अर्ध्या तासापूर्वी हा प्रकार घडला. 

महिला डॉक्टरची ओळख अद्याप पटली नसून महिला डॉक्टरने नेमकी उडी का मारली हे अद्याप स्पष्ट झाले नाही. बंडगार्डन पोलीस आणि ससून रुग्णालयाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.