Pune: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सभागृह नेते धीरज घाटे यांना फायबर ग्लासचे कवच

Pune: Fiberglass armor to House Leader Dheeraj Ghate on the backdrop of Corona in pmc पुणे शहरात कोरोनाचे संकट गंभीर झाले आहे. कधी कोणाला कोरोना होईल काहीही सांगता येत नाही. त्यामुळे पुणेकरांनी काळजी घ्यावी, असे आवाहन धीरज घाटे यांनी केले आहे.

एमपीसी न्यूज- पुणे शहरात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. महापालिकेच्या नगरसेवकांनाही मोठ्याप्रमाणात कोरोना झाला आहे. सभागृह नेते धीरज घाटे यांच्या कार्यालयात मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होत असते. त्या पार्श्वभूमीवर घाटे यांच्या भोवती फायबर ग्लासचे कवच उभारण्यात आले आहे. खबरदारी हा म्हणून उपाय केल्याचे घाटे यांनी सांगितले.

शहरातील कोरोना आटोक्यात आणण्यासाठी पुणे महापालिकेतर्फे विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. नागरिकांना मदत करण्यासाठी आम्ही सातत्याने पुढाकार घेत आहोत. नुकताच कोकणात वादळ येऊन नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यांना मदतही केली आहे.

पुणे शहरात कोरोनाचे संकट गंभीर झाले आहे. कधी कोणाला कोरोना होईल काहीही सांगता येत नाही. त्यामुळे पुणेकरांनी काळजी घ्यावी, असे आवाहन धीरज घाटे यांनी केले आहे.

पुणे महापालिकेत कोरोना रुग्ण वाढत असल्याने ठेकेदार आणि सर्वसामान्य नागरिकांना प्रवेश बंद केला आहे. नागरिकांनी आपल्या कामासाठी दूरध्वनी, ई- मेल, व्हाट्सएपच्या माध्यमातून संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पुणे शहरात आता कोरोनाचे रुग्ण 18 हजारांच्या आसपास गेले आहेत. रोज 500 च्या वर रुग्ण आढळून येत आहेत. सध्या कोरोनाच्या चाचण्याही वाढविण्यात आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी गरज असेल तरच बाहेर पडावे. अन्यथा घरीच राहण्याची गरज असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.