Pune : अंगडियाची 29 लाखाची रोकड चोरणाऱ्या पाच जणांना अटक

एमपीसी न्यूज- अंगडियाची 29 लाखाची रोकड चोरणाऱ्या पाच जणांना येरवडा पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्यांच्याकडील 10 लाख 50 हजाराची रोकड जप्त करण्यात आली. अंगडियाकडील एका माजी कर्मचाऱ्यानेच मित्रांच्या मदतीने हा कट रचल्याचे उघडकीस आले आहे.

गजानन उर्फ पिंटु पांडूरंग सुवर्णकार (वय 30,रा.गुरदाळ,ता.देवणी, जि.लातूर), संदीप तानाची बिरादार (वय 22), मंगेश रमेश बिरादार (वय 28), सुमीत बालाजी पाटील (वय 19), राहुल देवीदास सुर्यवंशी (वय 20, सर्व रा.लातूर) अशी अटक आरोपींची नावे आहेत.

याप्रकरणी विठ्ठल श्रीनिवासराव करजगीकर यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. फिर्यादी करजगीकर हे नांदेड येथे एका अंगडियाकडे काम करतात. करजगीकर हे अंगडियाने दिलेली 29 लाख 24 हजार 650 रुपयांची रोकड घेऊन मुंबईला खासगी बसने चालले होते. पुण्यात येरवडा येथील मशिदीच्या शेजारील मोकळ्या जागेत बस थांबल्यावर ते सॅक बाजूला ठेऊन लघुशंकेसाठी गेले होते. दरम्यान यांची रोकड असलेली सॅक चोरण्यात आली.

यातील मुख्य आरोपी गजानन हा पुर्वी संबंधित अंगडियाकडे कामाला होता. त्याचा अपघात झाल्याने त्याने नोकरी सोडून दिली होती. यामुळे त्याला अंगडियाकडून पैसे कधी, कोठे कसे पाठवले जातात याची माहिती होती. त्याने गावाकडील मित्रांच्या मदतीने रोकड लूटण्याचा कट रचला.

ही कारवाई पोलीस अपर पोलीस आयुक्त सुनील फुलारी, पोलीस उपायुक्त प्रसाद अक्कानवरु, सहायक पोलीस आयुक्त रामचंद्र देसाई, वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनुस शेख, पोलीस निरीक्षक अजय वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मंगेश भांगे, पोलीस कर्मचारी बाळु बहिरट, हणमंत जाधव, संदिप मांजुळकर, पंकज मुसळे, अशोक गवळी, मनोज कुदळे, मोहीते, कारखेले, समीर भोरडे, राहुल परदेशी, सकट, सुनील नागलोत, विष्णु सरादे, कुंवर आणी पाडोळे यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.