Pune : झोपडपट्टी परिसरात हॅन्डवॉश मशीन बसवून करोना विरुद्ध लढा सुरूच राहणार : अश्विनी कदम

एमपीसी न्यूज – झोपडपट्टी परिसरात हॅन्डवॉश मशीन बसवून करोना विरुद्ध लढा सुरूच राहणार असल्याचे नगरसेविका अश्विनी कदम यांनी सांगितले.

नगरसेविका अश्विनी नितीन कदम यांच्या प्रयत्नातून तळजाई वसाहत, अण्णाभाऊ साठे वसाहत, पद्मावती वसाहत, मोरे वस्ती, दाते बस स्टॉप परिसर, अण्णाभाऊ साठे वसाहत परिसर , सहकारनगर, टांगेवाला कॉलनी, मोगल वसाहत, पद्मावती या ठिकाणी हँडवॉश बेसिन बसवण्यात आले.

प्रभागमध्ये विविध ठिकाणी आतापर्यंत 10 हँडवॉश बेसिन बसविण्यात आले आहेत.

याबाबत सामाजिक कार्यकर्ते मुसा मोगल, सुयोग सोनवणे, रेहान काझी, कैलास शिंदे , प्रकाश सोनवणे, चंदन भोंडकर, गोपीनाथ जाधव, विठ्ठल शिंदे, गणपत ठोकरे, अनिकेत कदम यांनी आभार मानले.

_MPC_DIR_MPU_II

येणाऱ्या काळामध्ये वस्ती पातळीवर ठीक ठिकाणी एकंदरीत अशा प्रकारचे जास्तीत जास्त हँडवॉश बसवण्याचा संकल्प अश्विनी कदम यांनी केला आहे.

दरम्यान, सार्वजनिक स्वच्छतागृहांचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याने कोरोना वाढत असल्याचे महापालिकेच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे या स्वछतागृहांची वारंवार स्वच्छता केली जात आहे.

नागरिकांचे आरोग्य उत्तम राहावे, यासाठी महापालिकेतर्फे अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत.

कोरोना कंटेन्मेंट झोनमध्ये सध्या घरपोच अन्नधान्य पोहोचविण्यात येत आहे. नागरिकांनी सोशल डिस्टनसिंगचे पालन करावे, गरज नसेल तर घराबाहेर जाऊ नये, असे आवाहन पुणे महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

सध्या पुणे शहरात कोरोनाचे 4 हजारांच्या पुढे रुग्ण गेले आहेत. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

You might also like