Pune- किरकोळ कारणावरून दोन कुटुंबांमध्ये धक्काबुक्की; अकरा जणांना अटक

एमपीसी न्यूज – किरकोळ कारणावरून दोन कुटुंबांमध्ये झालेल्या भांडणामुळे पोलिसांनी भांडण करून धक्काबुक्की करणा-या अकरा जणांना अटक केल्याची घटना काल बुधवारी ( दि. 19 ) रात्री साडेआठच्या दरम्यान मुंढवा येथील पवारवस्ती केशवनगर येथे घडली.

याप्रकरणी सोमेश ऊर्फ गोलू किसन गायकवाड (वय 23), अंजु किसन गायकवाड (वय 24), गणपत मधुकर करंडे (वय 52), विक्रांत गणपत करंडे (वय 31), नितीन वासूदेव करंडे (वय 26), गणेश अर्जुन गायकवाड (वय 23), विनोद अनार गागडे (वय 52), रचना विनोद गागडे (वय 44), अनिकेत विनोद गागडे (वय 20), निलम विनोद गागडे (वय 21), निकीता राकेश गारूंडे (वय 25), यांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमेश गायकवाड हा मंगळवारी (दि.18) रात्री साडेआठ च्या दरम्यान विनोद गागडे यांच्या घरी दारू पिऊन गेला होता. त्यामुळे विनोद यांनी सोमेशला तेथून जायला लावले. याच कारणाचा राग धरून काल पुन्हा त्या दोन कुटुंबियांमध्ये वाद झाले. या भांडणामध्ये एकमेकांना शिविगाळ आणि मारहाण देखील झाली. त्यामुळे पोलिसांनी भांडण करणा-या दोन्ही कुटुंबांमधील मिळून अकरा जणांना अटक केली असून याप्रकरणी पुढील तपास मुंढवा पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.