Pune : महापालिकेतील रिक्त पदे भरण्यात यावी; विधी समितीच्या बैठकीत ठराव मंजूर

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेतील रिक्त पदे भरण्यात यावी, असा ठराव विधी समितीच्या बैठकीत बुधवारी मंजूर करण्यात आला. आता त्याला सर्वसाधारण सभेची मान्यता लागणार आहे, अशी माहिती समितीचे अध्यक्ष योगेश समेळ यांनी दिली.

अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा भरताना, संबंधित विभागातील व त्याच संवर्गातील सर्वात सेवाज्येष्ठ, अनुभवी व कार्यक्षम अधिकारी, कर्मचारी यांच्याकडे सोपविण्यात याव्यात, शासन निर्णयानुसारच पुणे महापालिकेततील रिक्त जागा व अतिरिक्त कार्यभार सोपविताना निर्णय घेण्यात यावा, असेही बैठकीत ठरले.

दिनांक ९ जानेवारी २०२० रोजी समितीच्या बैठकीत अजित दरेकर व सुनिता गलांडे यांनी ठराव मांडला होता. तो महापालिका आयुक्तांकडे अभिप्रायासाठी पाठविण्यात आला. दिनांक ५ सप्टेंबर २०१८ च्या शासन परिपत्रकाचा दाखला देत पालिकेतील रिक्त पदे भरण्यात यावी, असे महापालिका आयुक्त शेखर यांनी कळविले आहे.

तर, मुख्य विधी अधिकारी अ‍ॅड. रविंद्र थोरात सेवानिवृत्त झाल्याने त्यांच्या जागी अ‍ॅड. मंजुषा इधाटे यांची सेवा ज्येष्ठता व पदोन्नतीने नियुक्ती करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.