Pune : अखेर ‘त्या’ पुणे महापालिका पदाधिकाऱ्याचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह

Finally, the corona test report of 'that' Pune Municipal Corporation official is negative

एमपीसी न्यूज – पक्षनेत्यांच्या बैठकीला हजेरी लावणाऱ्या महापालिका पदाधिकाऱ्याचा कोरोना चाचणी अहवाल आज, बुधवारी निगेटिव्ह आला. त्यामुळे इतर पदाधिकारी आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सुटकेचा निःश्वास श्वास सोडला.

महापालिकेतील ज्या पदाधिकाऱ्याचा कोरोना चाचणी अहवाल आज निगेटिव्ह आला. त्या पदाधिकाऱ्याच्या कुटुंबातील एका सदस्याला कोरोनाची लागण झाली आहे.

त्यानंतर हा पदाधिकारी सोमवारी पक्षनेत्यांच्या बैठकीला उपस्थित होता. सर्व पक्षाचे नेते, महापालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त व इतर वरिष्ठ अधिकारीही या बैठकीला उपस्थित होते.

बैठक संपल्यानंतर चहापान आणि गप्पांचा फड रंगला होता. कोरोनाची चाचणी झालेला पदाधिकारी विविध किस्से सूनविण्यात पटाईत आहे. त्यामुळे सर्वांना हसून ठेवणे त्याचा छंद आहे. सर्वच राजकीय पक्षातील नगरसेवक या पदाधिकाऱ्याचे घनिष्ठ मित्र आहेत.

मात्र, या पदाधिकाऱ्याच्या कुटुंबातील व्यक्तीलाच कोरोना झाल्याने उर्वरित पदाधिकारी आणि महापालिका अधिकारी टेन्शनमध्ये आले होते. मंगळवारी आयोजित केलेली स्थायी समितीची बैठकही तहकूब करण्यात आली होती. आता या पदाधिकाऱ्याची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याने महापालिका अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

आता या पदाधिकाऱ्यासोबत उपस्थित असलेल्या अन्य पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांची कोरोना चाचणी होणार नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

सध्या पुणे शहरात कोरोनाचे संकट गंभीर आहे. महापालिकेचे अधिकारी आणि पदाधिकारी 24 बाय 7 काम करीत आहेत. सार्वजनिक ठिकाणी जाणे, लोकांना जास्तीत जास्त मार्गदर्शन करणे, बैठकांना हजेरी लावणे, दवाखान्यात भेटी देणे असे कार्यक्रम सुरू आहेत. मात्र, यापुढे त्यांनी अधिक दक्ष राहण्याची गरज निर्माण झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.