Pune – सव्वातीन कोटींचा इलेक्ट्रीक माल खरेदी करून एकाची फसवणुक

0 143

एमपीसी न्यूज-सव्वातीन कोटींचा इलेक्ट्रीक माल क्रेडिट कार्डवर खरेदी करून खात्यावर पैसे शिल्लक नसताना खाजगी बॅंकेचे एकूण 42 चेक देऊन आर्थिक फसवणुक केल्याची घटना खराडी मुंढवा पुलाजवळील चमाडीया एल.एल.पी. या इलेक्ट्रॉनिक्स कंपनीच्या मालकासोबत 3 जुलै ते 20 ऑगस्ट यादरम्यान घडली.

HB_POST_INPOST_R_A

याप्रकरणी शशिकांत चमाडीया (वय 42, रा. नॉर्थ कोरेगाव पार्क) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शशिकांत चमाडीया यांची खराडी मुंढवा पुलाजवळ  चमाडीया एल.एल.पी. नावाची इलेक्ट्रॉनिक्स ची कंपनी  आहे. त्यांची फसवणुक करणा-या एकाने त्यांना आपण लॉर्ड्स इलेक्ट्रीकल फर्मचे मालक असल्याचे सांगून तर त्यांच्या साथीदाराने आपण या फर्मचा व्यवहार पाहतो असे सांगून फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला.

त्यानंतर त्या दोघांनी मिळून 3 जुलै ते 20 ऑगस्ट या कालावधीत  फिर्यादी त्यांच्य़ाकडून लॉर्ड्स इलेक्ट्रीकल या फर्मच्या नावाने तब्बल 3 कोटी 15 लाख 31 हजार 864 रूपयांचा इलेक्ट्रीक माल क्रेडिट कार्डवर खरेदी केला. आणि त्या मालाची बुधवार पेठ येथील लॉर्ड इलेक्ट्रीकल तापकीर गल्ली येथे डिलीव्हरी करून घेतली. दरम्यान त्यांनी त्यांच्या लॉर्ड्स फर्मच्या खात्यावर पैसे शिल्लक नसताना  इलेक्ट्रीकल  मालाच्या रकमेचे खाजगी बॅंकेचे एकूण 42 चेक दिले. अशाप्रकारे त्यांनी फिर्यादीला मालाची रक्कम परत न करता त्यांची आर्थिक फसवणुक केली.

याप्रकरणीलॉर्ड इलेक्ट्रीकल  फर्मच्या दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास चंदननगर पोलीस करत आहेत.

HB_POST_END_FTR-A3
HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1
%d bloggers like this: