Pune: रिता इंडिया फाऊंडेशनच्या तर्फे अंध आणि दिव्यांग बांधवांसाठी “वित्तीय गुंतवणूक आणि संधी”  कार्यशाळा संपन्न

एमपीसी न्यूज –  रिता इंडिया फाऊंडेशनच्या अहमदनगर (Pune)आणि पुण्यातील सुखसागरनगर मधील अनामप्रेम संस्थेतील अंध आणि दिव्यांग बांधव यांच्यासाठी “वित्तीय गुंतवणूक आणि संधी” या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेचे स्वरूप ऑनलाईन आणि ऑफलाईन असे दोन्ही स्वरूपाचे होते.

या कार्यशाळेचा उद्देश आधुनिक भारत आणि सशक्त भारत (Pune)ह्या विचारांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि भारत जागतिक महासत्ता होण्यासाठी आपल्यातील दिव्यांग बंधू भगिनी यांना देखील आधुनिक प्रवाहात स्वतःच्या आयुष्याला आकार देण्यासाठी वित्तीय व्यवस्थापन/ गुंतवणूक कसे करावे आणि भविष्यातील वित्तीय संकटाना कश्या प्रकारे सामोरे जावे त्यासाठी गुंतवणूक ही कशात करावी? वेगवेगळ्या वित्तीय गुंतवणुकीचे लाभ कसे मिळवावे.यावर हि कार्यशाळा घेण्यात आली. हि कार्यशाळा रिता इंडिया फाऊडेशनच्या संस्थपिका आणि अर्थशास्त्र विषयाच्या प्राध्यापिका डॉ. रिता मदनलाल शेटीया यांनी घेतली. सर्व विद्यार्थ्यांना नोटबुक्स, पेन्स आणि स्नॅक्स चे वाटप करण्यात आले.

Junnar : आदिवासी वस्तीवर घराला आग; संपूर्ण संसार जळून खाक

कार्यशाळेत सहभागी झालेला शुभम वाघमारे म्हणाला कि, डॉ. रिता मॅडम यांनी आर्थिक गुंतवणूक आणि संधी या विषयावर अतिशय मनोरंजक आणि अतिशय उपयुक्त सत्र आयोजित केले. त्यांनी आम्हाला गुंतवणुकीचे महत्त्व आणि आता केलेली गुंतवणूक तुम्हाला भविष्यात कशी मदत करेल हे सांगितले. त्यांनी आम्हाला काही व्हिडिओ दाखवले ज्यामुळे आम्हाला म्युच्युअल फंडाची संकल्पना आणि महत्त्व समजण्यास मदत झाली. तुमचे पैसे वाया घालवू नका , तुमचे पैसे गुंतवा हि टॅग लाईन आम्हाला खूप काही शिकवून गेली. भविष्यात आम्हाला नक्कीच या कार्यशाळेचा उपयोग होईल, असे मत व्यक्त केले.

या कार्यशाळेसाठी आर्थिक सहकार्य मुंबई, वसई येथील हॉसिंग पॉईंट ग्रुपचे संस्थापक रोहित शुक्ला आणि पुण्यातील विशाल मुसळे यांचे लाभले. हि कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी एच सी डॉ. सविता शेटीया , मंगेश वाघमारे , कुमकुम लुंकड यांचे सहकार्य लाभले. तसेच कार्यक्रमासाठी अनामप्रेमचे अहमदनगर आणि सुखसागर नगरचे प्रकल्प समन्वयक अभय रायकवाड आणि ऋषिकेश पाटील यांचे सहकार्य लाभले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.