Pune Fire : तुळशीबागेत ट्रान्सफॉर्मरला तर वानवडीत ज्वेलर्सच्या दुकानाला आग

एमपीसी न्यूज – पुण्यातील तुळशीबागेत आज पहाटे एका इलेक्ट्रिक ट्रॉन्सफॉर्मरला आग (Pune Fire) लागली. पुणे अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले असून या दुर्घटनेत कोणाही जखमी झाले नाही अथवा कोणत्याही प्रकारची जीवितहानी नाही. 

तुळशीबागेतील गणपती शेजारी असणाऱ्या ट्रान्सफॉर्मरला आज (गुरुवारी) सकाळी आठच्या सुमारास आग लागली. सकाळच्या वेळी गर्दी नसल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

घटनेची वर्दी मिळताच घटनास्थळी कसबा अग्निशमन दलाचे वाहन पोहचले. अवघ्या पंधरा मिनिटात जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले. सकाळची वेळ असल्याने तुळशीबागेतील दुकाने बंद होती व गर्दी देखील नव्हती त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

ही कारवाई कसबा अग्निशमदलाचे प्रभारी अधिकारी कमलेश चौधरी, फायरमन राजू जगदाळे, अब्दुल पटेल, हरिश बुंदेल, चालक शमीर शेख यांनी केली आहे.

वानवडीते ज्वेलर्सच्या दुकानाला आग

पुण्यातील वानवडी भागातील सोळंके ज्वेलर्सच्या दुकानाला आग (Pune Fire) लागल्याची घटना घडली. या घटनेमध्ये जवळपास 30 लाख रुपये किंमतीची चांदी जळून गेली असून शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता अग्निशामक विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

Pune Police Alert : कोंढव्यात ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा, शाळेच्या दोन सुरक्षारक्षकांना अटक

मिळालेल्या माहितीनुसार, वानवडी भागातील परमार पार्क सोसायटी येथील सोळंके ज्वेलर्स दुकानामधून सकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास धूर येत असल्याचे नागरिकांना दिसले.या घटनेची माहिती नागरिकांनी अग्निशामक विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली.त्यानंतर काही मिनिटात कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळवले. तर या घटनेत जवळपास 30 लाख रुपये किंमतीची चांदी जळून गेली आहे.तसेच ही आग शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.

अग्निशामक विभागाचे प्रभारी अधिकारी कैलास शिंदे,तांडेल महादेव मांगडे, ड्रायव्हर सत्यम चौखंडे, फायरमन सागर दळवी,निलेश वानखडे, दिनेश डगळे यांच्या मदतीने आगीवर नियंत्रण (Pune Fire) मिळविण्यात यश आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.