Pune : पुण्यातील विमाननगर भागातील फिनिक्स मॉलला भीषण आग, 5 बंब घटनास्थळी दाखल

एमपीसी न्यूज : पुण्यातील विमाननगर भागातील फिनिक्स मॉलला शुक्रवारी (दि.19 एप्रिल) रोजी दुपारी भीषण आग लागली.अग्निशमन दलाच्या 5 फायरगाड्या, 2 वॉटर टँकर व एक ब्रॉन्टो  घटनास्थळी (Pune) रवाना केल्या आहेत. ही घटना दुपारी 3.15 वाजता घडली.

याबाबतची सविस्तर माहिती अशी समजते की, फिनिक्स मॉल, नगर रस्ता (Pune) येथे आज दुपारी 3.15 वाजता आग लागल्याची  खबर मिळताच अग्निशमन दलाकडून 5 फायरगाड्या 2 वॉटर टँकर व एक ब्रॉन्टो रवाना करण्यात आल्या होत्या. फिनिक्स मॉलच्या तिसऱ्या मजल्यावर रेस्टॉरंटमध्ये आग लागून मोठ्या प्रमाणात धूर निर्माण झाला होता. सदर रेस्टॉरंट हे कोविड नंतर पूर्णपणे बंद होते. तसेच मॉलमधील अग्निशमन यंञणा अद्ययावत व चालू स्थितीत होती.

 

 

अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने आगीवर नियंञण मिळवले असून धोका टाळण्यात आला आहे. सद्यस्थितीत कुलिंग ऑपरेशन सुरू ठेवत आग पूर्णपणे विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. सुदैवाने अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठी दुर्घटना टळली असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आगीचे नेमके कारण अद्याप समजले नाही.  अग्निशमन दलाचे प्रमुख देवेंद्र पोटफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे 40 हून अधिक जवान व 6 अग्निशमन अधिकारी कर्तव्य बजावत आहेत,

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.