Pune: वारजेतील टेकडीवर सलग तिसऱ्या दिवशी आग

एमपीसी न्यूज – वारजेतील डुक्कर खिंड ते तिरुपतीनगर (Pune)दरम्यान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज जलतरण तलाव समोरील टेकडीवर आग लागून सर्व झाडें जळून खाक झाली. सलग 3 दिवसापासून आग लागल्याची घटना घडत आहे.
वारजे अग्निशमन केंद्रच्या सेवकांनी प्रयत्न करून आग विझविण्याचा प्रयत्न केला. या टेकडीवर मागील 8 – 10 वर्षांपासून वृक्ष लावण्यात आली आहेत.

सामाजिक कार्यकर्ते, मुले यांनी 7 ते 8 हजार रोपे लावले. (Pune)ही वृक्ष जगविण्यासाठी पाण्याची कमतरता आहे. सलग 3 दिवस झाले आग लागते आहे. त्याकडे वन विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप पुणे महापालिकेच्या शिक्षण मंडळाचे अध्यक्ष बाबा धुमाळ यांनी केला आहे.
वनसंरक्षन अधिकारी लक्ष देत नाही. या टेकडीवर सुरक्षा रक्षक तैनात नाही. त्यामुळे या टेकडीची सुरक्षा धोक्यात आली आहे, असेही धुमाळ यांनी सांगितले. नागरिकांनी धुमाळ यांना फोन करून या प्रकारची माहिती दिली असता, त्वरित अ्गिशमन केंद्रातील सेवकांना बोलावून घेतले. स्वतः या ठिकाणी जाऊन वनविभाग सेवकांना बोलविल्याचेही ते म्हणाले.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.