Pune Fire Brigade: कृतज्ञता गौरव कार्यक्रमात पालकमंत्र्यांच्या हस्ते अग्निशमन जवानांचा सन्मान

एमपीसी न्यूज – गणपती उत्सवात विविध विसर्जन घाटांवर काम करणारे अग्निशमन दलाचे (Pune Fire Brigade) अधिकारी व जवान तसेच जीवरक्षक यांचा कृतज्ञता गौरव कार्यक्रमात पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शनिवारी (दि.1) सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन पुण्यातील तुळशीबाग गणपती मंडळाने केले होते.  

पालकमंत्री पाटील म्हणाले की, जसे आपल्या सैन्याचे जवान सीमेवर तैनात राहून आपल्याला सुरक्षित ठेवतात त्याचप्रमाणे अग्निशमन दल हे आपआपल्या शहरामधे अंतर्गत सुरक्षा करत आपल्याला सुरक्षित ठेवण्याचे काम अगदी चोख बजावत असते.

यावेळी विशेष असे दलाचे मुख्य अग्निशमन (Pune Fire Brigade) अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांचाही सन्मान करण्यात आला. दलाचे प्रमुख देवेंद्र पोटफोडे यांनी यावर्षी प्रथमच विसर्जन घाटावर बंदोबस्तावर नियुक्त अधिकारी व जवान तसेच दलाचे नियंत्रण कक्ष यांचा एक वॉटसअप ग्रुप तयार केला होता. यामुळे उत्तमरित्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवता आले.

MCOCA : पुण्यातील विटकर टोळीवर मोक्का, चतुःश्रुंगी पोलिसांची कारवाई

विसर्जनाच्या वेळी कोणतीही दुर्घटना घडणार नाही आणि काही घडलेच तर तातडीने यावर उपाययोजना करणे सुलभ ठरेल अशा पद्धतीने सोशल मिडियाचा एक चांगला वापर त्यांनी यावेळी केला. तसेच मिरवणुकीच्या वेळी अग्निशमन वाहन व रेस्क्यू व्हॅन मदतीकरिता तैनात केल्या होत्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.