Pune : नाल्यात अडकलेल्याची अग्निशमन दलाकडून सुखरुप सुटका

एमपीसी न्यूज – काल झालेल्या मुसळधार पावसाने अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षात आज दुपारपर्यंत किमान 70 च्यावर झाङपङीच्या घटनांची नोंद झाली. यामध्ये एक वाईट घटना म्हणजे बसवर पडलेल्या झाङाने एका पीएमपीएमएल कर्मचारी याचा अंत झाला.

परंतु, काल रात्री गंज पेठ येथील नाल्यात सनी लुंकङे नावाचा इसम तोल जाऊन नाल्यात घसरला होता. पाऊस मुसळधार सुरूच असल्याने पाण्याचा प्रवाह वाढतच होता. त्याचवेळी अग्निशमन दलाचे जवान चंद्रकांत आनंदास यांनी तातडीने दलाकङील रस्सीचे लुप तयार करत त्याच्या दिशेने टाकून खांद्याकङून काखेत अङकावून त्या इसमाला हळूवारपणे नाल्यातून सुखरुप बाहेर काढले. तो सुखरुप बाहेर येताच त्याने घाबरलेल्या स्थितीतच अग्निशमन दलाचे आभार मानले.

या कामगिरीमध्ये अग्निशमन दलाचे सहाय्यक विभागीय अधिकारी रमेश गांगङ, चालक गणेश केदारी व जवान चंद्रकांत आनंदास, राजेश कांबळे, श्रावण चव्हाण यांनी सहभाग घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like