
Pune : कोंढव्यातील इमारतीच्या पाचव्या मजल्यावर आग, दोन फ्लॅट जळून खाक

एमपीसी न्यूज – कोंढवा येथील वेलकम हाॅलजवळ एका इमारतीच्या पाचव्या मजल्यावर आज रात्री आग लागून दोन फ्लॅट भस्मसात झाले. या आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.


आगीचे वृत्त समजताच अग्निशमन दलाच्या 5 फायरगाङ्या घटनास्थळी दाखल झाल्या व त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न सुरू केले. इमारतीत अडकलेल्या रहिवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. अग्निशमन दलास आग विझवण्यात यश आले असून कुलिंगचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले.
आगीत एक सिलिंडर फुटला असून कोणीहीजखमी नाही, मात्र दोन फ्लॅटमधील सर्व सामान जळाल्याचे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
