Pune : 100 हुन अधिक घरे आगीच्या भक्ष्यस्थानी (व्हिडिओ)

पाटील इस्टेट झोपडपट्टीमध्ये भीषण आग

एमपीसी न्यूज- वाकडेवाडी येथील पाटील इस्टेट झोपडपट्टीमध्ये गल्ली क्र. 3 मध्ये भीषण आग लागल्याची घटना आज दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास घडली. दुपारी 12:30 च्या सुमारास लागलेल्या आगीवर 3:45 पर्यंत नियंत्रण आणणे कठीण झाले होते . मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार , सिलेंडरचा स्फोट झाल्याने हि आग लागल्याचे समजते . दुपारी 3 वाजेपर्यंत 10 सिलेंडर फुटल्याचे समजते .

पुणे , पिंपरीचिंचवड अग्निशमन दल ,पुणे आणि खडकी कॅंटोन्मेंट पीएमआरडी एकूण ३० फायरगाडया घटनास्थळी असून आग विझवयाचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत .तसेच घटनास्थळी ऍम्बुलन्सही दाखल झाल्या आहेत . 2 वर्षांपूर्वी मंगळवार पेठ परिसरातील घटनेत जे अडथळे येत होते तेच पुन्हा अडथळे येत आहेत . अरुंद रस्ते असल्याने पाण्याचे पाइपही संवेदनशील भागात पोहोचवणे कठीण होते आहे . त्यात धुराचे प्रचंड लोट उठत असल्याने बघ्यांचीही गर्दी झाल्याने बचावकार्यात अडथळे येत आहेत . संगमवाडी पूल तात्काळ वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे .
तरी स्वतःचा संसार उध्वस्त होताना पाहून नागरिक हतबल झाले आहेत . या घटनेत बचावकार्यादरम्यान २ नागरिक किरकोळ जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात हलवले असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे . मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले असून सुदैवाने जीवित हानीझाली नाही .3:45 च्या दरम्यान आगीवर काही प्रमाणात नियंत्रण आणण्यात यश आले असून कुलींगचे काम सुरु कारण्याय आले आहे .

महापौर मुक्त टिळक यांनी घटना स्थळी भेट दिली आहे .2016 मध्ये मंगळवार पेठेत झालेल्या अग्नितांडवासारखेच पाटील इस्टेट परिसरातील आगीने रौद्र रूप धारण केले होते. अशा घटना घडल्यानंतर अग्निशमन दल शर्थीचे प्रयत्न करतात . पोलीस प्रशंसनाही परिस्थिती अधिक गंभीर होणार नाही यासाठी तत्पर असतात . पण,  आगीच्या घटना पूर्णपणे थांबवणे जरी शक्य नसले तरी बचावकार्य तत्परतेने पोहोचवण्यासाठी नियोजनबद्ध विकास केव्हा होणार हे येणार काळच ठरवेल .

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.