Pune : बिलावरून वसंत बारमध्ये बाउंसरकडून हवेत गोळीबार

एमपीसी न्यूज- मद्यपान व जेवणाचे बिल देण्याच्या कारणावरून ग्राहक आणि कर्मचाऱ्यांत वाद झाला. ग्राहक बिल देत नसल्याचे पाहून बाउन्सरने पिस्तुलातून हवेत गोळीबार केला. ही घटना पुणे शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या वसंत बारमध्ये सोमवारी (दि. 23) मध्यरात्री घडली. या प्रकरणी
समर्थ पोलीस ठाण्यात ग्राहक आणि गोळीबार करणाऱ्या बाउन्सरसह तेरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय.

_MPC_DIR_MPU_II

याबाबतची माहिती अशी की, मंगळवार पेठेतील वसंत बार मध्ये अक्षय काळोखे, संतोष बोराटे आणि सागर आगलावे या तिघांनी जेवण आणि मद्यपान केले. होतं. मात्र बिलावरून वाद झाल्याने बाऊन्सर महिमा शंकर तिवारीने गोळीबार केला होता. वसंत बार हा सदानंद शेट्टी या राजकीय नेत्याच्या मालकीचा आहे. नुकताच त्यांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.