Pune Fire News : मित्र मंडळ चौकजवळ एका विद्युत ट्रान्सफॉर्मरला लागली आग

एमपीसी न्यूज : पर्वती येथील मित्र मंडळ चौकजवळ (Pune Fire News) गुरुवार (1 डिसेंबर) रात्री एका विद्युत ट्रान्सफॉर्मरला आग लागली होती. सुदैवाने त्यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही.

याबाबत माहिती देताना अग्निशमन अधिकारी निलेश महाजन म्हणाले, कि मित्र मंडळ चौक येथे राजू उपाध्याय गॅस एजन्सी जवळ एका इलेक्ट्रिक ट्रॉन्सफॉर्मरला आग लागल्याची वर्दी गुरुवार रात्री 10 वाजून 22 मिनिटांनी मिळाली. त्यामुळे अग्निशमन विभाग मुख्यालय व जनता वसाहत अग्निशमन केंद्राचे प्रत्येकी एक अग्निशमन बंब घटनास्थळी पोहोचले होते. महावितरण अधिकाऱ्यांनी व ट्रान्सफॉर्मरचा विद्युत पुरवठा खंडित केला होता. त्यामुळे अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी फोमचा व पाण्याचा वापर करून आग विझवली.

स्टेशन ड्युटी ऑफिसर पंकज जगताप म्हणाले, की ट्रान्सफॉर्मरच्या (Pune Fire News)  आजूबाजूला गवत व वेली खूप वाढल्या होत्या. कदाचित त्यांच्यामुळे आग जास्त प्रमाणात लागली असावी. नागरिकांनी विद्युत ट्रान्सफॉर्मरच्या आजूबाजूच्या परिसरात गवत, झाडे व वेली वाढू देऊ नयेत. कारण त्यांच्यामुळे आग लागू शकते. आठ अग्निशमन कर्मचारी घटनास्थळी दाखल होते. त्यांना 10 मिनिटांत आग विझवण्यात यश आले.

Pune News: मुंबई उच्च न्यायालयाने पुणे आरटीओला ॲग्रीगेटर्स परवान्यासाठी रॅपिडोच्या अर्जावर पुनर्विचार करण्याचे दिले निर्देश

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.