BNR-HDR-TOP-Mobile

Pune – बुधवार पेठेतील बंद असलेल्या श्रीकृष्ण टॉकीजला आग; आग पूर्णपणे नियंत्रणात

PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – बुधवार पेठेतील बंद असलेल्या श्रीकृष्ण टॉकीजमध्ये अचानक आग लागली. ही घटना आज गुरुवारी (दि.10) दुपारी 4 च्या सुमारास घडली.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 2 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आणि पुढील काही वेळेतच आग नियंत्रणात आणण्यात अग्निशमन दलाला यश मिळाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी नाही. तरी या आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1
.